Saturday, April 18, 2026
HomePoliticalवनपरिक्षेत्राधिकारी मध्य चांदा यांच्या खुर्चीला आम आदमी पक्षाचे निवेदन
spot_img

वनपरिक्षेत्राधिकारी मध्य चांदा यांच्या खुर्चीला आम आदमी पक्षाचे निवेदन

वनपरिक्षेत्राधिकारी मध्य चांदा यांच्या खुर्चीला आम आदमी पक्षाचे निवेदन

श्रेयश वानखेडे:
         बल्लारपूर शहरात अनेक दिवसांपासून वन्यजीवांच्या हौदोसामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. यासाठी प्रामुख्याने शहरालगत असलेले पेपर मीलचे स्टाॅक यार्ड पण जबाबदार आहे, याच कारणासाठी आम आदमी पक्षाने निवेदन देण्यासाठीचा वेळ वनक्षेत्राधिकारी मध्य चांदा नरेश भोवरे यांच्याकडे मागितला असता त्यांनी वेळ तर दिला पण दिलेल्या वेळेत ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार व शहर उपाध्यक्ष अफजल अली यांनी त्यांच्याशी संपर्क केला व त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खुर्चीला निवेदन देणार हे सांगितले. यानंतर पक्षातर्फे वनक्षेत्राधिकारी मध्य चांदा यांच्या खुर्चीला निवेदन सोपविण्यात आले. या स्टाॅक यार्ड च्या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीत पेपरमील प्रशासनासोबत आपच्या तीन बैठका झाल्या. परंतु वनविभागाचे  अधिकारी उपस्थित नव्हते आणि पेपरमील प्रशासनाने पक्षाला लाकूड स्टाॅक यार्ड च्या अटी शर्ती संदर्भात कुठलीच माहिती दिली नाही. एका बाजूला चंद्रपुर मार्गावरील जंगल दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती असुनही वनविभागाने या स्टाॅक यार्ड वर आक्षेप का नाही घेतला? लाकुड स्टाॅक यार्ड बनविण्याची परवानगी  पेपरमील ला वनविभागाने दिली आहे का? परवानगी दिली असेल तर कोणत्या मापदंडावर दिली गेली? आणि याबाबत वनविभागाकडून कोणत्या अटी-शर्ती पेपरमील प्रशासनावर लादल्या गेल्या आहेत? कळमना सारखी आग लागण्याची घटना झाल्यास त्यासंदर्भात काय उपाययोजना असायला पाहिजे, पेपर मिल किती मात्रेत लाकुड स्टॉक करू शकते आणि याबाबत काही अटी-शर्तीं वनविभागाने पेपर मिल वर लादल्या असेल तर अशा सर्व बाबींची वनविभागाने पेपर मिलला दिलेले परवानगी माहिती पक्षाने मागितली.
याशिवाय या 2020 ते 2024 वर्षाच्या कालखंडात वन्य जीवांमुळे किती नागरिकांना जीव गमवावे लागले? त्यापैकी किती लोकांच्या कुटूंबांना आर्थिक भरपाई देण्यात आली? काहिंच्या फाॅरेन्सिक रिपोर्ट येण्यास इतका अवधी का लागत आहे? असे अनेक प्रश्न आम आदमी पक्षाने यावेळेस निवेदनात उपस्थित केले. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, अजयपाल सूर्यवंशी, किरण खन्ना, गणेश अकोले, मनीषा अकोले, आशिष गेड़ाम,  रेखा भोगे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page