श्रेयश वानखेडे:
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समितीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती समारोह संपन्न झाला. त्यात प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ चे जेष्ठ धम्म अभ्यासक डॉ. ललित बोरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बौद्ध अनुयायांनी आपले जीवन सुखकर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा देतांना दिलेल्या आचारसंहितेचा वापर आपल्या जीवनात करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमात सुरुवातीला त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. ५ वर्षाची चिमुकली तृषा वासेकर हिने सर्व उपस्थितांना मराठीतून पंचशील दिले.तर विधायक पंचशील ६ वर्षाचा शास्वत देवगडे यांनी दिले.धम्मवर्गातील विद्यार्थ्यांद्वारे बुध्द पूजा घेण्यात आली. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुद्धा विहारात कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बोरकर पुढे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या २२प्रतिज्ञा काटेकोर पालन केल्यास आदर्श नागरिक घडू शकतो.धम्मचारी रत्ननायक यांनी भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या दुःखातून मुक्ती शक्य आहे.त्या मार्गाने चालण्याची गरज आहे. पाली विहारात लहान मुलांवर संस्कार केल्या जात आहे हा मैलाचा दगड ठरू शकतो. असे अनुकरण करुन इतरही विहारात असे उपक्रम राबविण्यात यावे. असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान धम्ममित्र भास्कर भगत, डॉ. अजय जुमडे, बोरकर मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन परमानंद भडके, प्रास्ताविक नंदाताई मून,तर आभार संपत कोरडे यांनी मानले.