विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारा जिल्हा अधिवेशन संपन्न

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा जिल्हा द्वारा आयोजित जिल्हा अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री नानाभाऊ पटोले, अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, म.रा.मा.शि. महामंडळ सदस्य जगदीश जुनघरी, सय्यद मॅडम, माजी जिल्हाध्यक्ष विमाशी संघ श्री. होमराज कापगते, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर संचालक श्री. मनोहरजी राऊत, गटशिक्षणाधिकारी वरवाटे, जिल्हाध्यक्ष नागपूर (ग्रामीण) अनिल गोतमारे, उपाध्यक्ष श्री. धनराज राऊत, व्होरा सर, जिल्हाध्यक्ष गडचिरोली श्री. रवींद्र नैताम, कार्याध्यक्ष श्री. नरेंद्र भोयर, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह श्री. राजेश धुर्वे, जिल्हा कार्याध्यक्ष टेकचंद मारबते, श्री. धीरज बांते, संजय प्रधान, विजय देवगिरकर, भाऊराव वंजारी, विवेक मोठघरे, पंजाब राठोड,अनंत जायभये, संजय भावते, मिलिंदजी डोंगरे, राधेश्याम मुरकुटे, विश्वपाल हजारे, उदय तासेलवार, योगराज मेश्राम, केशव गाडेकर, प्रा. सोनकुसरे सर, श्री. किशोर पाचभाई, अर्चना नाकाडे, अस्मिता बोरकर, ज्योती अवचटे, चित्रलेखा आकारे, कांता कामते, वंदना अगासे, अर्चना भोयर तसेच जिल्ह्यातील शिक्षक संघटनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार श्री नानाभाऊ पटोले यांनी मार्गदर्शन केले.
संघटनेच्या ध्येय-धोरणांवर आधारित प्रास्ताविक करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, सेवा-सुरक्षा, शालार्थ वेतन प्रणालीतील अडचणी, पदोन्नती, प्रलंबित अनुदान, शिक्षकेत्तर कामांचा वाढता ताण तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील अंमलबजावणी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटन बळकट करण्यावर भर देत शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सदैव लढा देत राहील. शैक्षणिक प्रशासनातील बदल व शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनात्मक एकजूट हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी मत व्यक्त केले.










