श्रेयश वानखेडे:
बामणी प्रोटीन्स लिमिटेड व्यवस्थापनाकडून उद्योगातील मान्यताप्राप्त युनियन किंवा कामगारांना कोणती पूर्वसूचना न देता दिनांक 19 मे 2024 रोजी बेकायदेशीरपणे टाळे बंदी चा निर्णय घेण्यात आला. त्या दुर्भाग्यपूर्ण निर्णयाच्या विरोधात भारतीय केमिकल वर्कर्स युनियन बामणी च्या नेतृत्वात बामणी प्रोटीन्स लिमिटेड मधील कामगारांचे दिनांक 20 मे 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
या संदर्भात व्यवस्थापनाने सूचना दिनांक 18 मे 2024 रोजी मेन गेटवर लावली आहे. ” दिनांक 18/05/2024 च्या उद्योग बंद च्या संदर्भान्वये, सर्व कामगार आणि कॅज्युअल लेबर यांना सूचित करण्यात येते की, आपण दिनांक 19/05/2024 पासून उद्योगात ड्युटीवर येऊ नयेत. आपला पगार वेळोवेळी देण्यात येईल आणि भरपाई रक्कम व इतर देय रक्कम दिनांक:21/07/ 2024 पर्यंत आपल्या खात्यात जमा करण्यात येईल. दिनांक 19/05/ 2024 पासून आपणास ड्युटीवर येण्याची आवश्यकता नाही. फॅक्टरी गेटला कुलूप लावण्यात आला आहे. आणि फॅक्टरीच्या आत AGM( P & A) किंवा CE BPL यांच्या परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.”
नियमानुसार कोणत्याच कामगारांना तीन महिन्याआधी कामावरून कमी करण्याचा नोटीस प्राप्त झाला नाही. अशी माहिती कामगारांकडून प्राप्त झाली. बामणी प्रोटीन्स लिमिटेड व्यवस्थापनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे जवळपास 200 कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
9 जनांचे बोर्ड असणाऱ्या या फॅक्टरी चे मुख्य कार्यालय केरला (कोची) येथे असून यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर येथे बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परिसरातील नागरिकांची मागणी आहे की, लवकरात लवकर ही फॅक्टरी चालू करण्यात यावी आणि कामगारांना न्याय द्यावा.