Friday, April 17, 2026
HomeYojnaसंजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न,342 प्रकरण निकाली
spot_img

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न,342 प्रकरण निकाली

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न,342 प्रकरण निकाली

श्रेयश वानखेडे:
संजय गांधी निराधार अनुदान योजनेची  बैठक दि. 27 जून 2024 रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी सदर योजनेतील सुमारे 258 लाभार्थ्यांची प्रकरण मंजूर करण्यात आली तर 58 प्रकरण त्रुटी पूर्ततेसाठी अर्जदारां कडे परत पाठवण्यात आल्यात. अपंग, निराधार, विधवा, परित्यगता, अविवाहित, दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्ध आदी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. सदर लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे. याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्री समीर केने, सचिव नायब तहसीलदार महेंद्र फुलझले, अजय मल्लेलवार , समिति सदस्य श्री राजेश दासरवार,
श्री मल्लेश कोडारी, श्री सतीश कनकम, सौ वैशालीताई जोशी श्री किशोर मोहुर्ले, श्री रमेश पिपरे, श्री अनिल मोरे यांच्या तसेच इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page