Thursday, January 22, 2026
HomeEducationचंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022-...
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022- 23 (माध्यमिक संवर्ग) मुलाखतीच्या समितीवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीज्योती  सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022- 23 (माध्यमिक संवर्ग) मुलाखतीच्या समितीवर प्रश्नचिन्ह

गुणदानाची माहिती आतापर्यंत दिली नाही 

शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण संचालक पुणे यांच्या कामगिरीबद्दल द्वितीय अपिल माहिती आयोगाकडे दाखल

श्रेयश वानखेडे:
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2022- 23 (माध्यमिक संवर्ग) गटात दिनांक: 14/07/ 2023 रोजी मुलाखत झाली. माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवली होती आणि वेळेवर हे स्थान बदलून  डायट चंद्रपूर येथे मुलाखत ठेवण्यात आली.
मुलाखत घेतांना निवड समिती सदस्य मान. माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि मान. प्राथमिक शिक्षण अधिकारी हे उपस्थित नव्हते. रूम नंबर 1, रूम नंबर 2, रूम नंबर 3 मधे मुलाखतीची व्यवस्था करण्यात आली होती. माध्यमिक संवर्ग मध्ये एकूण 12 जण असताना त्यांच्या मुलाखती निवड समितीने न घेता, त्यांनी सांगितलेल्या व्यक्तींनी घेतल्या, गुणदान केले आणि नंतर एक फायनल यादी बनवून निवड समितीने समितीच्या स्वाक्षरीने पुरस्कारासाठी पाठवले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुलाखतीमध्ये ज्यांचे काही कागदपत्र कमी होते. त्यांना दोन-तीन दिवसाचा वेळ गोलमाल करण्यासाठी देऊन 17/07/ 2023 ला फायनल यादी बनवण्यात आली.
एक निवड समिती सदस्य हे मागील 15 ते 17 वर्षापासून काम करीत आहे. ते सेवानिवृत्त झाले आहे, त्यांचे वय सुद्धा 70 ते 75 च्या जवळपास आहे. आता शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल याबाबत कदाचित त्याला माहिती नसेल, चंद्रपूर जिल्ह्यात बरेचशे आदर्श शिक्षक असताना त्यांना न घेता यांनाच कसे काय दरवर्षी घेतले जाते. याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्यांची निवड करून नाव राज्य पुरस्कारासाठी पाठवायचे असते त्यांची मुलाखत हेच घेत असतात अशी चर्चा जोरासोरात सुरू आहे.
याबाबत मान. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि मान. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना माहिती अधिकार 2005 अंतर्गत गुणदान तक्ता मागितला, परंतु दोन्ही कार्यालयाने गुणदान तक्ता आतापर्यंत दिला नसल्यामुळे प्रथम अपील सादर करण्यात आले. त्यातही काहीच उत्तर दिले नसल्यामुळे दोन्ही कार्यालयाच्या बाबत द्वितीय अपील राज्य माहिती आयोगाकडे सादर करण्यात आले आहे.
यामध्ये सेटिंग करून पुरस्काराचे वाटप सुरू झालंय की काय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवड समितीमध्ये एकच एकच आदर्श शिक्षक व्यक्तीची आवश्यकता असताना, मात्र त्या ठिकाणी दोन आदर्श शिक्षक यांना मुलाखत घेण्यासाठी बोलवण्यात आले होते हे कारण गुलदस्त्यात असल्याचे चर्चिले जात आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page