Shreyash Wankhede:
जिल्हा भरातील शाळेची घंटा १ जुलै रोजी वाजली.मोठ्या उत्साहात विद्यार्थी नव्या जोमाने शाळेत येऊ लागले.मात्र अध्यापनाचे कार्य करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षक नाही.हा असंतोष पालक व विद्यार्थी वर्गात निर्माण झाला.आमच्या शाळेत शिक्षकांची भरती करा.या मागणीला घेऊन पालक व विद्यार्थ्यांनी दिनांक:०५-०७-२०२४ रोजी शुक्रवारला जिल्हा परिषदेवर धडक देऊन आक्रोश व्यक्त केला.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल व पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव ( मोरे ) येथील जिल्हा परिषद शाळेत अनुक्रमे या शैक्षणिक सत्रात वर्ग ५ ते १० वर्गापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विसापूर येथील शाळेत १७५ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहे. मात्र शिक्षकांची संख्या केवळ दोन आहे. या शाळेत विध्यार्थ्यांच्या तुलनेत पुन्हा ५ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र शाळा सुरु होऊन देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांची अद्याप नियुक्ती केली नाही. परिणामी पालक व विद्यार्थ्यात आक्रोश निर्माण झाला.
विसापूर येथील शाळा व्यवस्थापन समितीने यासाठी शिक्षण विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला.मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळेत शिक्षक भरती बाबत अनस्था दाखवली.यामुळे पालक व विद्यार्थी संतापून शुक्रवारी ११ वाजता धडकले.
पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव ( मोरे ) येथे देखील वर्ग ५ पासून १०वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र येथील शाळेत शिक्षकच नाही. येथील शाळेत १८० विद्यार्थी आहेत.शिक्षकाअभावी पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी धडक देऊन जिल्हा परिषद घोषणाबाजी करून परिसर दणानुन टाकला.शिक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापांचे म्हणून म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन्स यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्तिथी होती. विसापूर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चौधरी,सदस्य सुनील नाकाडे,सुनील पुणेकर,ग्रामपंचायत सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,ग्रा.पं. सदस्य सुनील रोंगे,प्रदीप गेडाम ,शारदा डाहुले,वैशाली पुणेकर,रिना कांबळे आदीने आंदोलनाचे नेतृत्व केले.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या
विसापूर येथील शाळेचे विद्यार्थी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कार्यालय समोर शिक्षक द्या,म्हणून ठिय्या देऊन घोषणा देत होते.याची माहिती होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन आपल्या दालना बाहेर आले.त्यांना सभागृहात घेऊन गेले.त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तुमचे शिक्षणांचे धडे गिरवा.तुम्ही मोठे व्हा.कोणत्याही आंदोलनात सहभाग घेऊ नका,असा सल्ला विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना दिला.यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ( प्राथ ) अश्विनी सोनवाने उपस्थित होते.