Wednesday, January 14, 2026
Homeबल्लारपूररेल्वे गाडीतून मोबाईल चोराला अटक : आरपीएफ बल्लारशाह ची कारवाही
spot_img

रेल्वे गाडीतून मोबाईल चोराला अटक : आरपीएफ बल्लारशाह ची कारवाही

रेल्वे गाडीतून मोबाईल चोराला अटक : आरपीएफ बल्लारशाह ची कारवाही 

श्रेयश वानखेडे: 
एका मोबाईल चोराला आरपीएफ बल्लारशाह ने पकडून त्याच्या जवळून तीन मोबाईल जप्त केले आहे.
         11 जुलै रोजी रात्री 02.53 वाजता, विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष अधिकारी, नागपूर यांच्याकडून माहिती मिळाली की, ट्रेन क्र. 22403 न्यू दिल्ली एक्स्प्रेस च्या एस 6 कोच मध्ये प्रवाशांनी एका संशयितास पकडले आहे.  माहिती मिळाल्यानंतर, जेव्हा ही गाडी बल्लारशाह स्टेशन पीएफ क्रमांक 04 वर आली असता  एएसआय रामलखान आणि हवालदार मो. अन्सारी हे कोच S-6 मध्ये गेले तिथे प्रवाशांनी एका संशयित व्यक्तीला पकडले होते. कागजनगर स्थानकावर हा मुलगा डब्यात संशयास्पदरित्या फिरताना दिसला असता प्रवाशांनी त्याची चौकशी केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने प्रवाशांनी सदर संशयित व्यक्तीला कोचमध्ये पकडुन ठेवले. त्याच्याजवळ 03 मोबाईल सापडले, त्याबाबत डब्यातील कोणत्याही प्रवाशाचे मोबाईल नव्हते. सदर आरोपीचे नाव सुहेल ​​अन्वर वय 21 वर्ष, कटका बाराबंकी, उत्तर प्रदेश आहे.
 त्याला जवळून 3 मोबाईल जप्त करून  पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी पोस्ट बल्लारशाह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोहवा अन्सार खान, पोशी अखिलेश चौधरी करत आहेत.
        सदर कारवाही आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page