Thursday, January 22, 2026
HomeEducationएम. जे. एफ. मध्ये 11 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
spot_img

एम. जे. एफ. मध्ये 11 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

एम. जे. एफ. मध्ये 11 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार  समारंभ संपन्न

श्रेयश वानखेडे:
महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ  महाविद्यालय बल्लारपूर द्वारे मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्वागत समारंभ दिनांक 15 जुलै 2024 ला पार पडला. या स्वागत सोहळ्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी.चव्हाण तसेच प्रमुख अतिथी डॉ. विनय कवाडे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मोहितकर सर आणि इंग्रजी माध्यम कॉमर्स चे पर्यवेक्षक लाभे सर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन कुमारी गायत्री पांडीने केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रस्ताविकमध्ये लाभे सरांनी इंग्रजी माध्यम चे माजी विद्यार्थी सी.ए. करिता प्रयत्नरत असल्याचे सांगितले . 12वी च्या परीक्षेत प्रथम आलेल्या कु. माहीचा सत्कार करण्यात आला. डॉ.विनय कवाडेनी आपल्या भाषणामध्ये कॉमर्स विभाग किती आवश्यक आहे याची माहिती पटवून दिली. तसेच मोहितकर सरांनी आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर अध्यक्ष डॉ. बि. डी. चव्हाण यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि कनिष्ठ महाविद्यालयाला सुसंस्कारित करण्याकरिता आवश्यक माहिती दिली. शेवटी जेसीका मातंगी ने आभार प्रदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने  सांगता करण्यात आली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page