Sunday, January 18, 2026
HomeCrimeपेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपींची कारागृहात रवानगी
spot_img

पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपींची कारागृहात रवानगी

पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपींची कारागृहात रवानगी 

श्रेयश वानखेडे :-
पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपींची आज कारागृहात रवानगी केले आहे. आरोपींचे आज चार दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यांना पोलीसांनी आज न्यायालयात हजर करून पाच दिवसाची पोलीस कोठडी ची मागणी केली होती. पण न्यायालयांनी आरोपींची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
         ७ जुलै रोजी रोजी बल्लारपूर येथील मालू वस्त्र भंडार  या कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहाय्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते.
         सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन  पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु  यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारपूर पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवून अटक केले होते. तर बल्लारपूर पोलीसांनी नागपुरातून निरज गुप्ता व एका आरोपीला तसेच बल्लारपूर शहरातून दोन आरोपींना अटक केले होते.
      आता पर्यंत या हल्यातील सहा आरोपींना जेरबंद केले असून मुख्य आरोपी सूरज गुप्ता हा आता पर्यंत पोलिसांचा हाती लागला नाही.
        हे प्रकरण विधानसभेत उपस्थित केले होते तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाणेदार चे बदली करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. पण येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी या हल्याचे बारकाईने तपास करीत चार आरोपींना अटक केले आहे. तसेच मुख्य आरोपी सूरज गुप्ता याचा मागावर पोलीस असून त्याला लवकरात लवकर अटक केले जाणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page