श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर येथील वरिष्ठ पत्रकार अॅड. मंगल जीवने यांचे चिरंजीव सम्यक जीवने यांनी वार्विक युनिवर्सिटी युके (लंडन) मधून सायबर सिक्योरिटी मॅनेजमेंट ( मास्टर ऑफ सायन्स ) मध्ये प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. त्याचा सत्कार सोहळा २६ जुलै रोजी वार्विक युनिवर्सिटी च्या ” ग्रॅज्युएशन डे ” २०२४ या कार्यक्रमात वार्विक युनिवर्सिटी चे व्हाईस चांसलर व अध्यक्ष बाॅरोनेस कॅथी ऑस्टन व रजिस्ट्रार राॅबिन क्लार्क यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. सम्यक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व गुरूजनांना दिले आहे. त्याचेवर सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.