Tuesday, July 28, 2026
HomeEducationइंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नागपंचमीच्या न दिलेल्या सुट्टीबाबत स्पष्टीकरण सादर करावे
spot_img

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नागपंचमीच्या न दिलेल्या सुट्टीबाबत स्पष्टीकरण सादर करावे

इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नागपंचमीच्या न दिलेल्या सुट्टीबाबत स्पष्टीकरण सादर करावे

श्रेयश वानखेडे:

चंद्रपूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेने स्थानिक सुट्टी दिनांक: 09/08/ 2024 नागपंचमी च्या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे आदेशाची अवहेलना केल्याबाबत, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर यांचे पत्र दिनांक:09/08/ 2024 नुसार श्री. विवेक आंबेकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग जिल्हा चंद्रपूर यांनी मान. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले होते.
त्यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूर पत्र क्रमांक/ जि प च/ शिक्षण( माध्यमिक) /टेबल क्रमांक 7/ 2582/ 2024 दिनांक:20/08/ 2024 नुसार मुख्याध्यापक इंग्रजी माध्यमिक माध्यम शाळा सर्व जिल्हा चंद्रपूर यांना दिनांक:09/08/2024 ची स्थानिक सुट्टी नागपंचमीची जाहीर केली होती. परंतु आपण सदर तारखेला शाळेला सुट्टी दिलेली नाही. याबाबत सदर निवेदनाद्वारे या कार्यालयास विचारणा केली आहे. आपण कार्यालयीन आदेशाची वारंवार अवहेलना करत आहात. असे माझ्या निदर्शनात आले आहेत तरी याबाबत आपले स्पष्टीकरण या कार्यालयास 7 दिवसाच्या आत सादर करावे. शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सर्व स्थानीक सुट्ट्या देणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. तरी यापुढे आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे  शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page