Friday, August 14, 2026
spot_img
HomePoliceबल्लारपूरकर सावधान...! वॉल कंपाऊंड गेट चे ताला तोडून वाहन होत आहे...

बल्लारपूरकर सावधान…! वॉल कंपाऊंड गेट चे ताला तोडून वाहन होत आहे चोरी

बल्लारपूरकर सावधान…!  वॉल कंपाऊंड गेट चे ताला तोडून वाहन होत आहे चोरी

श्रेयश वानखेडे:
 गेल्या हफ्त्यात बालाजी वॉर्ड येथे वॉल कंपाऊंड गेट चे ताला तोडून मोपेड चोरी गेली होते. तर १३ ऑगस्ट ला कॉलरी ग्राउंड समोरून एक मोटासायकल चोरी गेली होती. १५ ऑगस्ट ला गांधी चौक परिसरातून नाष्टा करायला गेलेला युवकाची मोटासायकल चोरांनी पळविली. आता तर चक्क वॉल कंपाऊंड गेट चे ताला तोडून मोपेड चोरून नेल्याची घटना शिवाजी वॉर्ड येथे उघडकीस आली.
           शिवाजी वॉर्ड, साई बाबा मंदिर जवळ राहणारे तरुण महेश चावडा यांनी आपली मोपेड होंडा ॲक्टिवा क्रं एमएच ३४ बीएस ३६४८ वॉल कंपाऊंड गेट ला ताला लावून १९ ऑगस्ट रात्री ११ वाजता अंगणात ठेवली होती. पहाटे ५ वाजता उठून बघितले असता त्यांना त्यांची मोपेड दिसली नाही. वॉल कंपाऊंड गेट चे ताला तुटून दिसला. त्यांनी आजूबाजच्या परिसरात पाहणी केली परंतु त्याला मोपेड दिसली नाही. या वरून त्यांनी मोपेड चोरी झल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page