Wednesday, January 14, 2026
HomeEducationकेजीएन पब्लिक स्कूल तथा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा
spot_img

केजीएन पब्लिक स्कूल तथा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा

केजीएन पब्लिक स्कूल तथा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा

श्रेयश वानखेडे:

केजीएन पब्लिक स्कूल तथा ज्युनिअर कॉलेज चंद्रपूर येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास आमदार श्री. सुधाकर अडबाले  उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, डॉ. अभिलाषा गावतुरे, सय्यद रमजान अली, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर मेहमुद सर, प्रिन्सिपल सुजाता करमनकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी संस्थेच्या चंद्रपूर व बल्लारपूर शाळेतील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

आज ज्या शिक्षकांच्या भरोवश्यावर मी सभागृहात गेलो, त्या शिक्षकांच्या प्रकरणांबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही. आताच एका अधिकाऱ्याला निलंबित केले. अजून विदर्भातील अनेक अधिकारी माझ्या रडारवर असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना एक संधी देऊनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसतील तर भविष्यात त्यांच्यावर देखील कारवाई होईल. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत त्यांचे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी आभार मानले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page