श्रेयश वानखेडे:
श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ( कला व विज्ञान) बामणी (दुधोली) ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण” सत्र दिनांक 14/9/2024 ला सकाळी 7:45 ते 9 चे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 10 वी चे 198 मुले व 182 मुली असे एकूण 380 विद्यार्थी, व 20 शिक्षक सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. अनिता पंधरे मॅडम, नोडल टिचर श्री सुभाष सोनटक्के सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.