Friday, December 12, 2025
HomeEducationश्री. साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली
spot_img

श्री. साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली

श्री. साई तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅली

संस्थाचालकास सद्बुद्धी देण्यासाठी माता महाकालीला साकडे

बल्लारपूर मंथन वृत्तसेवा : 
श्री साई तंत्रनिकेतन चंद्रपूर व श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणारा, भद्रावती येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू असून आज तंत्रनिकेतन व महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्था चालकांना अनेक वर्षापासून शोषित व त्रस्त  कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांबाबत सद्बुद्धी देण्यासाठी काँग्रेस नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात श्री.साई तंत्रनिकेतन ते महाकाली मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली आणि माता महाकालीला साकडे घालण्यात आले. मागील दहा ते पंधरा वर्षापासून  आंदोलक कर्मचारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात अतिशय  तटपुंजा वेतनावर सेवा देत असून त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार वेतन भत्ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युएटी मिळण्या ची संविधानिक मागणी सर्व शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत.या आंदोलन मघ्ये राजु झोडे, वैभव पिपंळशेडे, सचिन ढेंगडे, विशाल शिपी, भूपेश पिंपळशेडे, माणिक येरगुडे, संगिता गोचो, संहिता यादव, नथू येरगुडे, प्रदिप डाहुले आदि आंदोलन पैदल मोर्चा मधे  सामिल होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page