श्रेयश वानखेडे:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बल्लारपूर तर्फे दिलीप टॉकीज समोरील मैदानावर संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला, उत्सवापूर्वी संघ स्वयंसेवकांमार्फत शहरातील मुख्य मार्गावर शिस्तबद्धरित्या संचलन करण्यात आले. यावेळी नागरिकां तर्फे पुष्प फुलांच्या वर्षाव करण्यात आला, संचलनाचा समारोपा नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. विजयादशमीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे अध्यक्ष मधुकर लोंढे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ता म्हणून रमेश मंडळे विभाग व्यावसायिक कार्यप्रमुख चंद्रपूर विभाग हे उपस्थित होते, यावेळी मंचावर जिल्ह्याचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक विवेक गडकर उपस्थित होते.