Sunday, December 7, 2025
HomeChandrapurदक्षता जनजागृती सप्ताह 2024
spot_img

दक्षता जनजागृती सप्ताह 2024

दक्षता जनजागृती सप्ताह 2024

श्रेयश वानखेडे:

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी एक आठवडा ” दक्षता जनजागृती सप्ताहाचे ” आयोजन करण्यात येते. सन 2024 मध्ये दिनांक: 28 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ” दक्षता जनजागृती सप्ताह 2024 ” साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शासन निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयातर्फे ” सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ”  ही संकल्पना घेऊन विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.
 महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक: 28 ऑक्टोबर 2024 रोज सकाळी 11 वाजता लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग चंद्रपूर या कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ तसेच मान. राज्यपाल व मान. मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त दिलेला संदेश  वाचून पुढील कार्यक्रमास प्रारंभ  करण्यात आला आहे तसेच पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसार माध्यमांद्वारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात ” लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे” असे फलक लावणे आवश्यक असून, लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर, टोल फ्री नंबर लिहिणे आवश्यक आहे. अशा सूचना शासकीय कार्यालयांना दिल्या आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कामात जनतेला सहभागी करून घेण्याकरीता त्यांच्याकडे ” भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या सरकारी नोकरांविरुद्ध (अधिकारी/ कर्मचारी) तक्रार असल्यास नागरिकांनी प्रत्यक्ष खालील पत्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा” असे आवाहन सौ. मंजुषा म. भोसले पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी प्रेस नोट द्वारे केले आहे.
लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयाचा पत्ता: पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर, हुतात्मा स्मारकाच्या मागे सिव्हिल लाईन चंद्रपूर 442401
लाचलुचपत  प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयाचा संपर्क क्रमांक:
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक: 07172( 250251)
टोल फ्री क्रमांक: 1064
श्रीमती मंजुषा भोसले पोलीस उप अधीक्षक : 9322253372
श्री. जितेंद्र गुरनुले पोलीस निरीक्षक: 8888857184
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page