श्रेयश वानखेडे:
त्रिरत्न बौद्ध महासंघ, बल्लारपुर ( केंद्र चंद्रपुर) द्वारा दिनांक 01/12/2024 ला अलंकार पैलेस सभागृह येथे दुपारी 12 ते 3 वाजे दरम्यान धम्ममित्र दिक्षा समारंभ पार पडला. डॉ. आंबेडकर व छत्रपति शिवाजी महाराज यांचे भव्य पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून मिरवणुकी सह सर्व धम्मचारी गण, धम्ममित्र,सहाय्यक,होणारे नवं दीक्षित तथा उपस्थित जन समूदाय जय घोष करीत सहभागी झाले.
सर्व प्रथम आदर्शाची पूजा, वंदना घेन्यात आली व नंतर पाहुण्यांचे स्वागत करन्यात झाले. धम्मचारी संघशील चेअरमन,केंद्र चंद्रपूर यांनी 16 नवदीक्षार्थीना दीक्षा दिली. ( 13 भगिनी व 3 पुरुष )धम्मचारी विवेकप्रभ यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले.विशेष उपस्थिती धम्मचारीनी पुष्पप्रभा मित्र संघटक ह्या होत्या.
समारंभाचे संचलन धम्मचारी पद्मरत्न यांनी केले. आभार व पुण्यानुमोदण धम्मचारी रत्ननायक यांनी केले. 150 उपस्थित भगिनी व बंधूंचे साक्षीने 16 धम्ममित्राणी दिक्षा ग्रहण केली. डॉ. किरण भगत व अमरदीप भगत साहेबांनी भव्य व सुसज्ज हॉल दान स्वरुपात उपलब्ध करून दिला. एवढेच नव्हे तर उपस्थितांना अल्पापोहार सुद्धा उपलब्ध करून दिला.
बल्लारपूर येथे एकूण 27 धम्ममित्र त्रीरत्नास प्रतिज्ञा बद्ध होण्यास व धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत.