मालकाच्या( मतदार ) मागणीनुसार मतपत्रिकेनेच मतदान घ्या…. बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडीची मागणी
श्रेयश वानखेडे:
दिनांक 2 डिसेंबर 2024 ला बल्लारपूर शहर वंचित बहुजन आघाडीने मान. तहसीलदार मार्फत मान. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना एक निवेदन प्रेषित करण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली की, सध्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम चा घोळ बघता राज्यातील वातावरण अत्यंत दूषित झालेले आहे. सामान्य नागरिकांचा मतदान पद्धती आणि लोकशाही वरचा विश्वास कमी होत चाललेला आहे या परिस्थितीला निवडण्यासाठी मतदान प्रक्रियेचा प्रमुख असलेला व मानाचा केंद्रबिंदू असलेला मतदार या देशाचा खरा मालक आहे व या मालकाला आपल्या आवडीनिवडीनुसार अमलात असलेल्या दोन मतदान पद्धती पैकी विश्वासनीय असलेली मतपत्रिकेतून मतदान करण्याची पद्धत स्वीकार करून पुढे होऊ घातलेली बल्लारपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी व या मागणीच्या कारवाईची संदर्भातील माहिती दहा दिवसाच्या आत वंचित बहुजन आघाडीला पत्रव्यवहारातून कळवण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन तहसील कार्यालयामार्फत मान. जिल्हाधिकारी यांना प्रसिद्ध करण्यात आले याप्रसंगी पक्षाचे बल्लारपूर शहराध्यक्ष उमेश जनार्दन कडू तसेच शहर महासचिव गौतम रामटेके शहर संघटक राकेश पेटकर महिला आघाडी जिल्हा सल्लागार सत्यभामाताई भाले महिला आघाडी तालुकाध्यक्ष नम्रताताई साव युवा आघाडी जिल्हा कार्यकारणी सदस्य अश्विन शेंडे युवा आघाडी तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, परमानंदजी भडके, कुंजबिहारी बडघरे सर, देवराम नंदेश्वर सर, प्रियंकेश शिंगाडे, स्वीटी लोंढे, प्रज्ञा लोंढे, कुंदा नारांजे, स्वराज करमरकर, मारुती निवलकर, सुरज शृंगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.