Sunday, December 7, 2025
HomeChandrapurदत्त जयंती महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ
spot_img

दत्त जयंती महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

दत्त जयंती महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

श्रेयश वानखेडे:

नानाजी नगर नागपूर रोड येथील सार्वजनिक दत्त मंदिरात दिनांक १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.वडगाव प्रभाग तसेच संपूर्ण शहरातील श्री दत्ताच्या हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे  आयोजन या ठिकाणी करण्यात येते.

विशेष म्हणजे दत्त जयंती निमित्त संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सजावट करण्यात आली होती.मंदिर  परिसराला रंगरंगोटी करण्यात आली. परिसरातील सर्व झाडांना सुद्धा सजवण्यात आले.मंदिराच्या समोर तसेच आतील भागात महिलांनी काढलेली आकर्षक रांगोळी भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. परिसरातील सर्व रस्त्यांवर दुतर्फा रांगोळी टाकण्यात आली.दोन दिवस श्रीदत्ताच्या गाण्यांनी या संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
     स्वर्गीय फकीराजी पाटील येरगुडे यांनी ५१ वर्षांपूर्वी या दत्त मंदिराची  स्थापना केली.मागील ५१ वर्षापासून मंदिरात  दत्त जयंती व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यंदा सलग ५२ व्या वर्षी दत्त जयंती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते. जवळपास १० हजारच्या वर भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाप्रसाद आयोजन समिती, नानाजी नगर महिला मंडळ, नवदत्त बालगणेश मंडळ, दत्तनगर परिसरातील दत्त बाल युवा गणेश मंडळ तसेच साई मंदिर परिसरातील दीपस्तंभ बौद्ध मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page