बल्लारपूर येथे परभणी घटनेचे पडसाद…
श्रेयश वानखेडे:
परभणी घटनेचा व शहिद सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक १६/१२/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस व राज्य शासनाचा निषेध म्हणून बल्लारपूर येथे भीम सैनिकांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ निषेध आंदोलन करण्यात आले.
भीमसैनिकांनी विरोध करत परभणी घटने संबंधाने आंदोलन केले. बल्लारपूर मधील तमाम आंबेडकरी व संविधानवादी जनतेने राज्य सरकारचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येन सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला होता. तसेच या विरोधात तहसीलदार अभय गायकवाड यांना निवेदन दिले.