Thursday, June 4, 2026
HomePoliceनायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर चंद्रपूर शहर पोलिसांची धाड
spot_img

नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर चंद्रपूर शहर पोलिसांची धाड

नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर चंद्रपूर शहर पोलिसांची धाड

श्रेयश वानखेडे:
जीवघेण्या नायलॉन मांजाने दरवर्षी संक्रांतीच्या काळात काही जखमी होतात. अनेकांना प्राणाला मुकावे लागते. त्यामुळे या मांजावर शासनाने प्रतिबंध घातला आहे. नायलॉन मांजा वाहतुक, साठवनुक व विक्री वर महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागचे परिपत्रक क्र. सि.आर.टि/२०१५/प्र.क.३७/ता.क.-२ दि. २८/०६/२०१६ अन्वये प्रतीबंधक घालण्यात आले आहे. यानंतरही जीवघेण्या मांजाची शहरात चोरट्या मार्गाने खरेदी- विक्री होत आहे. परंतु यंदा पोलीस प्रशासनाने संक्रांतीच्या एक महिन्यांपूर्वीच या मांजाची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर पोलिसांनी १५ डिसेंबरला केलेल्या कारवाईत १४ हजार अधिक किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करून एका आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.
     चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक प्रतीबंधीत नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानादारावर कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असता मुखबीर कडुन माहीती मिळाली की, एक इसम जोळदेउळ चौक वि‌ठ्ठल मंदीर वार्ड चंद्रपुर येथे प्रतीबंधीत नायलॉन मांजा विक्री करत आहे. मुखबीरने दिलेल्या माहीती प्रमाणे जोळदेउळ चौक वि‌ठ्ठल मंदीर वार्ड चंद्रपुर येथे गेले असता एक इसम आपल्या हातात पांढ-या रंगाची नायलॉन चुंगळी घेवुन उभा दिसला. त्याची अधिक चौकशी केले असता त्यांनी आपले नाव सौरभ देविदास निलेवार वय २४ वर्ष रा. दादमहल वार्ड, चंद्रपुर असे सांगीतले. त्याचे जवळील पांढ-या रंगाची नायलॉन चुंगळीची झडती घेतली असता त्यात २० नग कोबरा गोल्ड नायलॉन मांजाच्या चकरी किंमत १४,००० रुपयेचा माल आरोपीच्या ताब्यातुन मिळुन आला. आरोपी सौरभ देविदास नीलेवर वय २४ वर्ष याच्यावर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १५,५, बीएनएस कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
     सदर कारवाई चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, मपोहवा भावना रामटेके, पो अं दिलीप कुसराम, इम्रान खान, विक्रम मेश्राम यांनी केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page