जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे गणित दिनाचे आयोजन
श्रेयश वानखेडे:
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे गणित दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक तथा यु. के. रांगणकर सर विज्ञान शिक्षक यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्रीनिवास रामानुजन यांच्या फोटोला मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुणे यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, रामानुजन सर काय होते हे जगाला शंभर वर्षांनी समजले.
एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, आपल्या जन्मापासून गणिताचा संबंध येतो आहे आणि त्याचा आपण अभ्यास करणे आवश्यक आहे. अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी करून विद्यार्थ्यांना गणित दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ते पुढील प्रमाणे,
गणितीय परिपाठ मध्ये गणितज्ञाच्या रंजक गोष्टी या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमात
प्राथमिक गट:
कु. अवनी पेटकर- प्रथम,
कु. शिफा शेख- द्वितीय,
कु. अनुष्का दुर्गे- तृतीय,
कु. शिक्षा रामटेके – चतुर्थ.
माध्यमिक गट:
कु. त्रिशाली महानंद – प्रथम,
कु. रूपाली निमकर- द्वितीय,
कु. राशी वेले – तृतीय क्रमांक प्राप्त केलेत.
गणितीय रांगोळी उपक्रमामध्ये भौमितिक आकार या विषयांतर्गत
प्राथमिक गट:
कु. शिक्षा रामटेके- प्रथम,
कु. आराध्या वेले- द्वितीय.
माध्यमिक गट:
कु. त्रिशाली महानंद- प्रथम,
कु. आनंदी गवई- द्वितीय,
कु. रूपाली निमकर-तृतीय,
कु. राशी वेले- प्रोत्साहन पर क्रमांक प्राप्त केलेत.
चित्रकला स्पर्धा उपक्रम अंतर्गत आकृतीबंध या विषयाअंतर्गत
प्राथमिक गट:
कु. अनुष्का दुर्गे-प्रथम,
कु. अवनी पेटकर- द्वितीय,
कु. शिफा शेख- तृतीय.
माध्यमिक गट:
अथर्व हिकरे- प्रथम,
कु. त्रिशाली महानंद- द्वितीय,
कु. राशी वेले- तृतीयक्रमांक प्राप्त केलेत.
परीक्षकाचे काम एम. डी. टोंगे, एस. एम. चव्हाण आणि एस. एन. लोधे मॅडम यांनी बघितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण सर यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी चॉकलेट वाटप करून सांगता करण्यात आली.