माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकाऱ्याद्वारे मनमानी सुरू
जिल्हा विज्ञान प्रदर्शनी सुद्धा घपला करण्याची शक्यता?
माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयाच्या ठिकाणी माहिती अधिकारी कार्यरत आहे. त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या आदेशाचा बाजा वाजवीला असून, दिनांक: 13/09/2024 रोजी, आता ज्या शाळेत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी होत आहे. त्या शाळेत विज्ञान मेळावा भरवण्यात आला होता त्यावेळेस यांनी पैसे खाऊन नंबर दिल्यामुळे, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आले होते त्याचा निकाल आतापर्यंत पेपरात डिक्लेअर करण्यात आलेला नाही अशी चर्चा आहे.
माहिती अधिकारी आहे हे माहितीचा अधिकारांमध्ये काम पाहण्यात पूर्णपणे बेकाम आहे. यांचे मुख्य काम पैसे खाऊन उलटे काम करणे हेच आहे. म्हणून अशा पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्हा विज्ञान प्रदर्शनी मध्ये कोणत्याही मुख्य पदावर जर ठेवले तर पुन्हा पैसे खाऊन आपल्याच माणसाला नंबर देण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे पूर्णपणे गोगलगाय आणि पोटात पाय असं असल्याची चर्चा सुरू आहे.
दिनांक:13/12/ 2024 ला माहितीचे अधिकारात यांना जे पत्र प्राप्त झालं, ते दिनांक: 12/01/2025 ला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा माहिती अधिकारी, पैसे खाण्यामध्ये गुंग असल्यामुळे यांचे या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे.
माहिती अधिकारी यांच्याकडे शिक्षण अधिकाऱ्याचे पद असताना, हे महाशय ज्या ज्या शाळेवर भेट द्यायला जात होते त्या त्या शाळेत अँटी करप्शन मध्ये सापडलेल्या व्यक्तीकडून हे आपला शहाणपणाच्या पोवाड्याद्वारे शिकवण्याचा व्हिडिओ बनवत असल्याची चर्चा सुरू आहे, त्यानंतर हे त्या शाळेच्या संस्था चालकाला/ मुख्याध्यापकांना तपासणीचे पैसे मागत होत असल्याची चर्चा सुरू आहे.
अशे अधिकारी जर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ठेवले तर ते आपल्याच चमचांच्या शाळेचे क्रमांक सेटिंग करून घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे चर्चेअंती दिसत आहे. म्हणून अशा लाचखोर अधिकाऱ्याला या जिल्ह्यातून हद्दपार करण्याची चर्चा सुरू आहे.