Wednesday, September 23, 2026
spot_img
HomeMaharashtraसंविधान घराघरात वाचले जावे-डॉ. सुरेश हिवाळे.

संविधान घराघरात वाचले जावे-डॉ. सुरेश हिवाळे.

संविधान घराघरात वाचले जावे-डॉ. सुरेश हिवाळे.

केमापूर येथे घर घर संविधान कार्यक्रम.

Shreyash Wankhede:
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत केमापूर येथे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘घर घर संविधान ‘ उपक्रम व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शुक्रवार ( दि. २४ ) रोजी नूतन विद्यालया तील सहशिक्षक, कवी डॉ. सुरेश हिवाळे यांचे व्याख्यान झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले की,आपल्या आदर्श भारतीय संविधानाने सर्वसामान्यांच्या प्रगतीचे मार्ग खुली केली आहेत. सन्माना ने जगण्यासाठी आव श्यक मुलभूत अधिकार दिली आहेत. सोबत च आपल्याला कुटुंब, समाज, राष्ट्राप्रतिच्या कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे. लोकशाही मुल्यांची संस्कार आपल्यावर करणाऱ्या भारतीय संविधान घराघरात वाचले जावे.असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. शरद ठाकर हे होते. तर व्यासपीठावर नारायण आष्टकर, दगडोबा माघाडे यांचीउपस्थिती होती. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना डॉ. सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ आपली मातृ भाषा मराठीला समृद्ध अशी परंपरा आहे. मराठीत खुप छान  बालसाहित्य आहे. ते विद्यार्थ्यांनी वाचावे. वाचनातून व्यक्तिमत्त्व विकासासह विद्यार्थी संस्कारित होतात. ‘ असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रभावती घुगे  यांनी केले. सुत्र संचलन प्रणिता गाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दगडोबा माघाडे यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page