Tuesday, May 5, 2026
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे निरोप समारंभ
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे निरोप समारंभ

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे निरोप समारंभ

श्रेयश वानखेडे:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 10 वी व 12 वी विद्यार्थिनींना मोठ्या उत्साहात निरोप समारोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून  मान. श्री  इब्राहिम जव्हेरी सर उपसचिव बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर उपस्थित होते व कार्यकमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या प्राचार्या असमा खान खलिदी मॅडम उपस्थित होत्या.
तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका विमल रच्यावार मॅडम व स्व. कुलसमबाई जव्हेरी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कू. हर्षा वरगंटीवार तसेच हक्कीमुद्दीन जव्हेरी कन्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रहेना अली मॅडम उपस्थित होत्या
कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीसाठी खूप भरभरून शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थ्यांनींनी पण त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व शिक्षकांकडून निरोप घेताना भावुक झाल्या. शिक्षकांनी गायन कविता सादर केले. सर्व विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका असमा खान खलिदी मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन वैशाली उमाटे मॅडम यांनी केले व आभारप्रदर्शन लता शेंडे मॅडम यांनी केले. कार्यक्रम झाल्यावर लगेच सर्व विद्यार्थिनीना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग झाले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page