Sunday, May 3, 2026
HomeParbhaniआय डी एफ सी बॅंकेमार्फत मुलांच्या स्वच्छता गृहाचे लोकार्पण.
spot_img

आय डी एफ सी बॅंकेमार्फत मुलांच्या स्वच्छता गृहाचे लोकार्पण.

आय  डी एफ सी बॅंकेमार्फत मुलांच्या स्वच्छता गृहाचे लोकार्पण.

श्रेयश वानखेडे:
दि.11  येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आय डी एफ सी फर्स्ट भारत या बॅंकेमार्फत मुलिंसाठी  स्वच्छता गृह उभारण्यात आले. त्या स्वच्छता गृहाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. 2014 पासून सीआरसी अंतर्गत 11 राज्यात ही बॅंक काम करते. महाराष्ट्रातील तीन शाळांची निवड करण्यात आली होती. त्या मध्ये न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींच्या स्वच्छता गृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमास त्रिची (तमिळनाडू) येथील सीएसआरचे प्रमुख प्रवीण अंबुराज, जॉन पॉल अशोक, सीएसआर कार्यक्रम प्रमुख, शरद देढे , प्रादेशिक प्रमुख, सिध्दार्थ धनवडे, शाखा व्यवस्थापक प्रमुख, सेलू, नितीन गोरे, गोपाल भोसले, माधव भिसे, शाळेचे पर्यवेक्षक धनंजय भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी के तोटेवाड यांनी केले तर आभार डी एस मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर गाडेकर, विष्णू सरकटे, रामेश्वर कदम, मंजूशा बोराडे, अंगद मोरे आदिंनी सहकार्य केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page