Monday, September 14, 2026
spot_img
HomeEducationराज्यातील कॉन्व्हेंट शाळेची एस आय टी द्वारे चौकशी व्हावी.

राज्यातील कॉन्व्हेंट शाळेची एस आय टी द्वारे चौकशी व्हावी.

राज्यातील कॉन्व्हेंट शाळेची एस आय टी द्वारे चौकशी व्हावी.

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्रात सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळा या राज्याच्या शैक्षणिक कायद्याचे पालन न करता मनमानी पद्धतीने शिक्षण संस्था चालकांकडून चालविल्या जात असून या शाळेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठे मोठे डोनेशनच्या रकमा घेऊन तथा आपापल्या शाळेत मनमानी पद्धतीने खाजगी पब्लिकेशनचे पुस्तके विक्री करून व शिक्षकांना नियमानुसार वेतन न देता अल्पशेवेतन देऊन करोडो रुपये हे शाळेतील संस्थाचालक कमवीत आहे. या सर्व भ्रष्टाचाराला शिक्षण विभागातील मोठे अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचा आशीर्वाद लाभला असून ते या शाळेच्या माध्यमातून लाखो रुपये कमवीत आहे. अशा या शैक्षणिक भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकरिता राज्याने एसआयटी स्थापन करून हा करोडो रुपयांच्या शैक्षणिक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणावा व दोषींवर कडक कारवाई करावी.
आत्ताच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून माजी शिक्षक आमदार नागोजी गाणार यांनी अनुदानित शाळेतील बोगस शिक्षक भरतीचा 500 करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला व शिक्षण उप संचालक व शिक्षण अधिकाऱ्यांन वर  फौजदारी कारवाई करवली.
त्याचप्रमाणे सरकारने या कॉन्व्हेंट शाळेचा भ्रष्टाचार उघडकीस आणून राज्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभागाचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page