Friday, May 1, 2026
HomeParbhaniगुलाबराव ताठे यांना खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ...
spot_img

गुलाबराव ताठे यांना खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रधान.

गुलाबराव ताठे यांना खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक  पुरस्कार प्रधान.

श्रेयश वानखेडे: 

सेलू येथील ताठे कोचिंग क्लासेसचे संचालक गुलाबराव ताठे यांना इचलकरंजी येथे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसंगी प्रदेश सचिव प्रा गंगाधर पडनूरे उपस्थित होते.गुलाबराव ताठे यांना शैक्षणिक सामाजिक केलेल्या कार्याबद्दल आदर्श शिक्षक व समाजभूषण पुरस्काराने दि.13 एप्रिल रविवार रोजी सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मा. आमदार अशोकराव माने, सत्येंद्रराजे निंबाळकर, प्रमोद माने, रावसाहेब भोसले, अंजली आकळे, आप्पा साहेब भोसले, बापूसाहेब अडसूळ,डॉ. शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. गुलाबराव ताठे यांनी आपल्या आयूष्यातील अनंत संकटांचा सामना करीत धैर्याने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने सर्व घटकातील गोर गरीब विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून ताठे कोचिंग क्लास ची निर्मिती करण्यात आली आणि त्या द्वारे अनेक अडचणी वर मात करीत त्यांनी आज यशस्वीपणे वाटचाल करीत हजारो विद्यार्थ्यांना घडविले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत विशालक्रांती न्युज पेपर व व्हि.के.फाउंडेशन कोल्हापूर यांनी आपल्या वर्धापन दिनानिमित्त गुलाबराव ताठे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या या पुरस्काराबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा ना दादाजी भुसे, एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक,औदुंबर उकिरडे पुणे बोर्ड सचिव, पुणे बोर्ड सदस्य बापूसाहेब अडसूळ सचिन जगताप शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page