Tuesday, August 4, 2026
spot_img
Homeबल्लारपूरमहात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगु विद्यालय बल्लारपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगु विद्यालय बल्लारपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न

महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगु विद्यालय बल्लारपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:
दिनांक  14/04/2025 सोमवार ला विद्यालयात  महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अतिथींनी भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला  अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मकसूद अहमद सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक तथा संस्थेचे सचिव श्री. सुभाष ताजने सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर साळवे सर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सहायक शिक्षक श्री. पाथर्डे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. सुभाष ताजने  सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेल्या हक्क, अधिकार आणि  कर्तव्य यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मकसूद अहमद सर  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असलेल्या योगदाना ची जाणीव आपल्या मनोगतातून उपस्थित सर्वांना करून दिली. सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उर्दु विभाग प्रमुख श्री. सावसाकडे सर यांनी केले. अशी माहिती श्री. रवि अनसुरी सर यांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page