Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeYojnaप्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

प्रधानमंत्री आवास योजना सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ द्या : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र

Shreyash Wankhede : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र कुटुंबांसाठी टप्पा 2 अंतर्गत नवीन एक्सक्लूजन क्रायटेरियानुसार सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाकरिता 31 मे 2025 ही अंतीम मुदत होती. मात्र बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, पोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्राद्वारे केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2018 मध्ये तयार झालेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांसाठी टप्पा 2 अंतर्गत नवीन एक्सक्लूजन क्रायटेरियानुसार सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी शासनाने 31 मे 2025 ही अंतिम मुदत दिली असली, तरीही बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे त्यापासून वंचीत आहेत.

मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यांमध्ये ग्रामसेवकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. परिणामी, एका ग्रामसेवकाकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार आहे. याशिवाय, अनेक लाभार्थ्यांचे आधार अपडेट, नवीन जॉब व ई-केवायसीची कामे प्रलंबित आहेत. या कारणांमुळे सर्वेक्षणाची गती मंदावली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाकरिता मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांना पत्राद्वारे केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page