Friday, May 1, 2026
HomeChandrapurइतर मागासवर्गीय मुला / मूलींच्या शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित
spot_img

इतर मागासवर्गीय मुला / मूलींच्या शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

इतर मागासवर्गीय मुला / मूलींच्या शासकिय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर( जीमाका) :  इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले /मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहता यावे, यासाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा.
प्रवेशाचे निकष व नियमावली : 1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा 2. विद्यार्थी हा चंद्रपूर येथील स्थानिक रहीवासी नसावा 3.  विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षात्तच (Bachertor Degree) शिक्षण घेणारा असावा 4. वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखाचे आत असावे 5. विद्यार्थ्यांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे 6. आलेल्या लिंकवरती क्लिक करुन 6 पानांचा फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा 7. त्यातील नियमावलीचे काळजीपूर्वक वाचन करावे 8. व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडणे बंधनकारक आहे 9. बिगर व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी Non Cremylayer तसेच Cast Validity जोडू नये 10. सर्व विद्यार्थ्यांनी उत्त्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकिय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे 11. वर नमुद तसेच पान क्रमांक 6 वर लिहीलेली संपूर्ण कागदपत्रे जोडून सदर अर्ज वसतीगृहात जमा करावे, असे कळविण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page