Thursday, April 16, 2026
HomeParbhaniमधमाशी शेतीसाठी आवश्यक - डॉ. अनंत लाड.
spot_img

मधमाशी शेतीसाठी आवश्यक – डॉ. अनंत लाड.

मधमाशी शेतीसाठी आवश्यक– डॉ. अनंत लाड.

पुस्तक दिनी ‘ एक दिवस एक पुस्तक ‘उपक्रम संपन्न.

श्रेयश वानखेडे: 
शेतकरी आणि शेतीसाठी मधमाशी पालन एक उत्तम पुरक उद्योग आहे. यातून शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा उपलब्ध होतो. मधमाशी या शेतीसाठी आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी आपली मित्र असलेल्या मधमाशीचे महत्त्व ओळखले पाहिजे. असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किटक शास्त्र विभागातील प्रा. डॉ. अनंत लाड यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने ‘ मधमाशी पालन : एक प्रमुख उद्योग ‘ या पुस्तकावर बुधवार ( दि. २२ ) रोजी जागतिक पुस्तक दिनी आयोजित मासिक ‘एक दिवस एक पुस्तक’ उपक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई बाबा नागरी सहकारी बँकचे अध्यक्ष प्रगतीशील शेतकरी हेंमतराव आडळकर हे होते. तर ‘ मधमाशी पालन : एक प्रमुख उद्योग ‘ या पुस्तकाचे लेखक तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किटक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरूषोत्तम नेहरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. अनंत लाड म्हणाले की, ‘ मधमाशीचे शेतीसाठीचे महत्त्व जाणायला हवे. रासायनिक किटक नाशकांनी मधमाशी मरणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचे तंत्र शुध्द प्रशिक्षण घ्यायला हवे.’ याप्रसंगी डॉ. पुरूषोत्तम नेहरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महेंद्र वाटुरे, सोमेश्वर गिराम , ईश्वर घोडके, भगवान कुलकर्णी यांनी मधमाशी पालन संदर्भात डॉ. अनंत लाड यांना प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनंत मोगल यांनी केले. सुत्रसंचलन लक्ष्मण गाडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अजित मंडलिक यांनी केले. कार्यक्रमास ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर, शशीकांत कुलकर्णी, डॉ. शरद ठाकर, डॉ. सतीश मगर, डॉ. सुरेश हिवाळे, प्रा. प्रभाकर रावते, नारायण सोळंके, रामराव बोबडे, माधव गव्हाणे, किर्ती राऊत, संध्या फुलपगार यांची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page