Monday, April 20, 2026
HomeEducationशिक्षक आमदारांच्या सभेत १२ प्रकरणे "ऑन द स्पॉट" निकाली
spot_img

शिक्षक आमदारांच्या सभेत १२ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

शिक्षक आमदारांच्या सभेत १२ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली

वर्धा येथे विमाशी संघाची शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा


श्रेयश वानखेडे:

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने व माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील जि. प. / खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा २८ एप्रिल २०२५ रोजी स्व. सिंधुताई सपकाळ सभागृह, जिल्‍हा परिषद वर्धा येथे पार पडली. या समस्या निवारण सभेत मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,  प्रयोगशाळा सहायक, शिक्षण सेवक, अनुकंपा व इतर असे एकूण १२ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यतेचे पत्र देण्यात आले. यामुळे शिक्षक – कर्मचाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले.

‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘वि.मा.शि. संघा’च्या उपक्रमांतर्गत सभेत सुरुवातीला माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने कु. संदीपा सूर्यभान इपर (अण्णासाहेब गुंडेवार विद्यालय, नारा, ता. कारंजा घा.) यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती, श्री. हरिष शिवकरण भट्टड (भारत विद्यालय / उच्च माध्यमिक विद्यालय, हिंगणघाट) यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती, श्री. किशोर चवरे (भारत विद्यालय, हिंगणघाट) यांना उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती, श्री. विलास रामभाऊ भोमले (डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व क. महा. विद्यालय, हिंगणघाट) यांना पर्यवेक्षकपदी, श्री. ईश्वर शंकर चंदनखेडे (श्रीमती सिरेकुंवरदेवी मोहता विद्यालय, हिंगणघाट) यांना पर्यवेक्षकपदी, श्री. पवन आनंदराव धामसे (यशवंत हायस्कूल, हमदापूर, ता. सेलू) यांना सहाय्यक शिक्षक, श्रीमती रुपाली पंकज देवस्थळे (केसरीमल नगर विद्यालय, सिंदी (रेल्वे) तथा स्व. सौ. रमाबाई वझुरकर नगर क. म. वि. सिंदी (रेल्वे) ता. सेलू) यांना अनुकंपा तत्त्वावर प्रयोगशाळा सहाय्यक सेवक, श्री. किशोर सोनटक्के (जिजामाता विद्यालय वर्धा) यांना वरिष्ठ श्रेणी, श्री. चंद्रशेखर भाऊराव बाचले, श्री. विजय नामदेव कुंभारे, श्री. रमेश महादेव शेंडे, श्री. विनायक गोविंदराव कंडे (सर्व यशवंत विद्यालय केळझर) यांना २४ वर्षानंतरची आश्र्वासित प्रगती योजना मान्यतेचे पत्र “ऑन द स्पॉट” देण्यात आले.

सोबतच सभेच्या विषयसुचीतील प्रमिला प्रदीप ढबाले (श्री संत भाकरे महाराज विद्यालय, माणिकवाडा) यांचे सेवानिवृत्ती प्रकरण व इतर बरेचसे प्रकरणे सभेपूर्वीच निकाली काढण्यात आली होती.

यानंतर प्राथमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ./ माध्य.) यांना दिले. सदर सभा साडेसहा तास चालली.

यावेळी माजी आमदार व्ही. यू डायगव्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. पाते, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा भडंग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीतू गावंडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, कार्याध्यक्ष पांडुरंग भालशंकर, मुरलीधर धनरे, वेतन पथक (माध्य.) अधीक्षक ज्ञानेश्वर जवादे, सुहास गवते, शशांक हुलके, राजू चंदनखेडे, संदीप चवरे, सुरेशकुमार बरे, रवींद्र वाघमारे, प्रमोद खोडे, सौ. मंदा चौधरी, लोमेश वऱ्हाडे, सचिन बटाले, आशिष बोटरे, संजय पाटील, धर्मेश झाडे, सुनील धवणे, नंदकिशोर ठाकरे, संजय घोडमारे, प्रविण भोयर, चंद्रकांत ठाकरे, बालाजी पाटील, संभाजी घाटुर्ले, दिनेश वाघ, धर्मपाल मानकर, सतीश लोखंडे, विलास बोरगमवार, नरेंद्र गलांडे, प्रविण देशमुख, नरेंद्र ढवळे, संजय बावनकर, यशवंत गडवार, रितेश निमसडे, ज्ञानेश्वर फरकाडे, विश्राम पातोंड, पातोंड मॅडम, शिरीष ढुमणे, जगदीश सहारे, प्रफुल महंतारे, सुरेश वडुले, सुभाष तेलरांधे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्‍य व मोठ्या संख्येने समस्‍याग्रस्‍त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्‍थित होते. सभेच्या शेवटी पहलगाम हल्ल्यातील मयत नागरिकांना व माजी विस्तार अधिकारी श्रीराम दांडेकर यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून दिलगिरी

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती मनिषा भडंग ह्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी असभ्य भाषेत बोलत असल्याच्या प्राप्त तक्रारीवरून आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती भडंग यांना समज दिली. यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली व भविष्यात असे प्रकार होणार नसल्याचे बैठकीत सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page