सालोरी येथे 09 दिवसीय संस्कार शिबीर उत्साहात संपन्न्.
श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सरस्वती विद्यालय मुधोली ता.भद्रावती जि.चंद्रपूर व सरस्वती विद्यालय सालोरी ता.वरोरा जि. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 एप्रिल 2025 ते 03 मे 2025 या कालावधीत ‘अभ्यासकेंद्रित उन्हाळी संस्कार शिबिराचे ‘ आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये योगा, हस्तकला, लेझीम, कवायत, गाणी गोष्टी, आनंददायी व कृतीयुक्त गीते, चित्रकला, संगीत व नृत्य, शैक्षणिक चित्रपट, परिसर क्षेत्रभेट, पायाभूत मराठी, हिंदी, इंग्रजी, व गणिताचे सखोल असे मार्गदर्शन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी मजेदार आणि शैक्षणिक उपक्रम व सुंदर बालपन घडविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
निवासी उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मान. डॉ. सुधाकर हनवते साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या 09 दिवसीय शिबिरात अनुभवी तथा तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, त्यात मा. चहारे (गटशिक्षण अधिकारी) पंचायत समिती वरोरा, मा.निखिल बोबडे (तालुका क्रीडा अधिकारी) मा. संस्था संचालक प्रा. रमेशजी वाकडे सर, मा. मंगेशजी भांडेकर, विलासजी हजारे व अनंता अनवाळ योग शिक्षक, शंकर दिगदेवतुलवार सर, मा. रुपलालजी कावळे सर (ग्रामगिताचार्य), श्री. मा.वसंतराव लिपटे सर,सौ.राधाताई सवाने मॅडम (उपपाचार्या) तथा मा.प्रा. संदिप पारखी सर आनंदनिकेतन महाविद्यालय वरोरा. मा. प्रल्हाद ठक सर (चिञकार ), मा. नरेंद्र कन्नाके सर, डाँ.सौ.रश्मी हिवरकर मॅडम (आरोग्य अधिकारी ) , मा. ढोक वकील साहेब, श्री.भरडे सर, श्री.चौधरी सालोरी, या सर्व मान्यवरांचे अमुल्य असे मार्गदर्शन लाभले. मा. दामोदरजी केदार शाळा समिती अध्यक्ष सरस्वती विद्यालय सालोरी तथा संस्था संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी मा.अजाबराव नन्नावरे संस्था (सहसचिव), शिबिर प्रमुख, मा.सुरेशरावजी श्रीरामे (संस्था सचिव),शिक्षक पालक समिती उपाध्यक्ष मा.मोरे सर,मा.विश्वस्थ केशवराव जांभुळे,मा.रविभाऊ काळमेघ सर, मा तुळशिराम धारणे (सेवानिवृत्त विस्तार अधिकारी ), सौ सुकेशीनी घोडमारे मॅडम व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष मुधोली, शिबिर उपप्रमुख श्री. विलास खोंड सर , मुख्या. श्री. पिजदुरकर सर मुधोली, प्रशिक्षणाला उपस्थित विद्यार्थी आणि दोन्ही शाळेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस व प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले.अनेक विद्यार्थांनी आपले अनुभव कथन केले. पुढील वर्षी ला सुध्दा उत्तम प्रकारे शिबिर आयोजीत करण्याचे सुचविले. खेळीमेळीच्या वातारणात उत्कृष्ठ व्यवस्थेत शिबिराची सांगता करण्यात आली. व्यवस्था छान असल्यामुळे विद्यार्थी आनंदीत होते. याकरीता दोन्ही शाळेतील कर्मचाऱ्यांची खुप मदत व सहकार्य लाभले . सर्वानी दिलेल्या योगदानामुळे शिबिर उत्तमरित्या पार पडले. या कार्यक्रमाचे संचालन शिबीर उपप्रमुख मा. उराडे सर तर मा. मुख्या. संजीव धारणे सर ( सरस्वती विद्यालय,सालोरी) यांनी आभार मानले.