Tuesday, May 5, 2026
HomeParbhaniसेलूतील महावितरणचे कार्यकारी अभियंता उमेश धोंडगे यांचे निलंबन.
spot_img

सेलूतील महावितरणचे कार्यकारी अभियंता उमेश धोंडगे यांचे निलंबन.

सेलूतील महावितरणचे कार्यकारी अभियंता उमेश धोंडगे यांचे निलंबन.

थकबाकी वसूली कामात कुचराई भोवली.

श्रेयश वानखेडे: दि.27 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सेलू विभागातील वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यात अक्षम्य कुचराई केल्याबद्दल येथील कार्यकारी अभियंता उमेश विश्‍वनाथ धोंडगे यांना निलंबित करण्यात आले असून महावितरणच्या नांदेड परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी मंगळवार 27 मे रोजी त्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. महावितरण च्या सेलू विभागात कार्यरत असलेल्या कार्यकारी (वितरण) अभियंता उमेश धोंगडे यांना 4 मार्च 2025 रोजी महावितरण च्या नांदेड परिमंडळ कार्यालद्वारे पत्र पाठवून सेलू विभागातील थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयक वसूल करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. तसेच 16 एप्रिल 2025 रोजीच्या पत्राद्वारे थकबाकी कमी करण्याकरिता निर्देशित केलेल्या सूचनेनुसार धोंगडे यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित उप कार्यकारी अभियंता यांना नेमून देण्यात आलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांचे परिक्षण व अवलोकन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. परंतु, कार्यकारी अभियंता धोंगडे यांच्याकडून या संदर्भात काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.या पार्श्‍व भूमीवर महावितरणच्या नांदेड परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांनी आज मंगळवार 27 मे रोजी कार्यकारी अभियंता धोंगडे यांना निलंबित करण्यात येत असल्यासंदर्भात आदेश दिले. त्याद्वारे, आपल्या विभागाअंतर्गत वीज देयक वसुलीचे प्रमाण हे कमी असून एकूण देय थकबाकी च्या अत्यल्प आहे व ज्यामुळे कंपनीला आर्थिक उत्पनापासून वंचित राहावे लागत आहे. आपण आपल्या विभागाचे एक जबाबदार अधिकारी असून महावितरण कंपनीच्या महसुला शी निगडीत अतिमहत्त्वाचे कामकाज या कडे आपले अतिशय दुर्लक्ष असून, आपणास नेमून देण्यात आलेले वीज देयक वसुलीचे उदिष्ठ पुर्ण केलेले नाही. तसेच आपल्याअधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांचेवर आपले कुशल नियंत्रण नसल्यामुळे आपल्या विभागा तील वीज देयक वसुलीचे कामकाज उद्धिष्टपूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. सदर बाब ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे.

 तसेच सद्यस्थितीतील मान्सून आगमन असून अलीकडील काळात होणार्‍या वादळी वारे व पाउस याच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, या बाबत सर्व अधिकारी यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याबाबत च्या सूचना मुख्य कार्यालयामार्फत दिलेल्या असताना सुद्धा आपण 24 मे रोजी पासून आजतयागत म्हणजेच 27 मे पर्यंत वरिष्ठ अधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर आहात. ही बाब अतीशय बेजबाबदार स्वरूपाची असून आपले सदरील कृत्य गैरकृत्यात मोडत आहे.  आपले सदरचे कृत्य हे म.रा.वि.वि.कं.म कर्मचारी सेवाविनियम – 2005 मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाचे असून याकरिता आपणास कंपनीच्या सेवेमध्ये राहू देणे कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधा आणणारे आहे. सबब, म.रा.वि.वि.कं.म कर्मचारी सेवाविनियम क्र.88 (क) मधील तरतुदीनुसार व म.रा.वि.वि.कं.म कर्मचारी सेवाविनियमातील अनुसूची – ग सह प्रशासकीय परिपत्रक क्र. 512 दि. 02.07.2015 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार आपणास  27 मे 2025 पासून म.रा. वि.वि.कं.म च्या सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे मुख्य अभियंता माने यांनी या पत्राद्वारे नमूद केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page