Saturday, May 2, 2026
HomeEducationशाळा प्रवेशोत्सवाने चिंचाळा शाळा गजबजली!
spot_img

शाळा प्रवेशोत्सवाने चिंचाळा शाळा गजबजली!

शाळा प्रवेशोत्सवाने चिंचाळा शाळा गजबजली!

लहानग्यांच्या स्वागतासाठी आमदार सुधाकर अडबाले यांची खास सजवलेली कार ठरली आकर्षण

श्रेयश वानखेडे: तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिंचाळा येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानद्वार उघडणाऱ्या या मंगलप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांसाठी खास पाठवलेली सजवलेली कार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या आकर्षक वाहनातून लहानग्यांना शाळेपर्यंत आणून दिल्याने वातावरण भारावून गेले होते.
सकाळी ८ वाजता शाळा प्रवेश दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या दिंडीने गावात एक वेगळीच शैक्षणिक चळवळ निर्माण केली. दिंडीनंतर सकाळी ९ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री. सुधाकर अडबाले (विधान परिषद सदस्य, नागपूर शिक्षक मतदारसंघ) होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकं आणि बूट-सॉक्स वाटप करण्यात आले.
विशेष अतिथी म्हणून सौ. मीना साळुंखे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजेश पातळे, सरपंच शोभाताई चिमुरकर, मुख्याध्यापक नामदेव आस्वले, केंद्रप्रमुख श्रीमती फुलझेले, ग्राम. सदस्य श्री. प्रकाश शेंडे, माजी आदर्श शिक्षक दुर्योधन सर, श्री. बाबाराव माशिरकर, सचिव ग्राम. श्री. सुधाकर वासेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुधीर जुनघरी, पोलिस पाटील प्रवीण बोडेकर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, शाळेच्या प्रती प्रेम निर्माण व्हावे आणि शिक्षणाचा पहिला दिवस आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने आयोजकांनी सुंदर कार्यक्रम राबवला, याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी कौतुक केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page