Tuesday, April 21, 2026
HomeParbhaniनगरपरिषद सेलू च्या प्रवेश द्वारावर लावली बेशरमांची झाडे.
spot_img

नगरपरिषद सेलू च्या प्रवेश द्वारावर लावली बेशरमांची झाडे.

नगरपरिषद सेलू च्या प्रवेश द्वारावर लावली बेशरमांची झाडे.

श्रेयश वानखेडे:

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरडे आहे. उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट व त्यांचे नातेवाईक येतात. त्यांची या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर शौचाला बसावे लागत आहे. हे शौचालय साफ करण्यासाठी नगरपरिषद सेलू ला वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा निषेध म्हणून आज नगरपरिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशरमांची झाडे लावून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला. याउपर नगरपरिषदने या शौचालयाची साफसफाई नाही केली. तर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालण्याचा इशारा देण्यातआला. यावेळी जयसिंग शेळके, लालू खान, चंदू कदम, रफीक खन्ना, मोहन मोरे,मारोती ढोले, रोहित शेळके, ओम खेड़ेकर उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page