Wednesday, August 5, 2026
spot_img
HomeChandrapurचांदा इकोकेअर तर्फे लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट मध्ये वृक्षारोपण

चांदा इकोकेअर तर्फे लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट मध्ये वृक्षारोपण

चांदा इकोकेअर  तर्फे लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट मध्ये वृक्षारोपण

श्रेयश वानखेडे:
चांदा इको केअर फाउंडेशन चंद्रपूर तर्फे 22 जुलै  2025 ला लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट सिस्टर कॉलनी चंद्रपूर  परिसर येथे, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या संस्था अध्यक्षl मा. प्रेमीला दुबे   चांदा इको केअर फाउंडेशन चे अध्यक्ष विवेक आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते सौ. शितल रंगदळ प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेचे वातावरण स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक  रहावे, झाडे लावून मुलांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात आणून द्यावे, झाडांचे संवर्धन करावे, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा हा या कार्यक्रम राबविण्याचा चांदा इको केअर फाउंडेशन संस्थेचा मनोदय असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री विवेक आंबेकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले.
कार्यक्रमाला संस्थेचे  सहकोशाध्यक्ष अतुल अल्याडवार, सदस्य अतुल देवतळे,  प्रदीप देवइकर , जानवी मैंदळकर, रिता कोहचडे, सुनिता चव्हाण, रेशमा पांडे तथा  शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी मून  व शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page