Monday, April 20, 2026
HomeParbhaniघेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे.
spot_img

घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे.

घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे.

‘संतवाणी’ भक्ती संगीत मैफलीने श्रोते झाले मंत्रमुग्ध.

श्रेयश वानखेडे: सेलू येथील नूतन विद्यालयाचा संगीत विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंगळवार ( दि. ०८ ) रोजी प्रशालेच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात आयोजित ‘ संतवाणी ‘ भक्ती संगीत  मैफलीत गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘ घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे ‘, ‘ आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने,’ ‘ कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ ‘ काटे केतकीच्या झाडा’, ‘ विठू माझा लेकुरवाळा’ ही अभंग गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी सादर करून सभागृहातील वातावरण भक्तिमय केले.
राधिका परदेशी, गीत राठोड, कृष्णा पवार, वैष्णवी बोठे, सिद्धी शिंदे, प्रज्योत पांचाळ, श्रुती कुलकर्णी, ऋतुजा महाजन, अथर्व तोडकर, अनुष्का वाघ, चैतन्य सावजी, प्रशांत इंगळे, रोहन वाघमारे, अवधूत दहिवाल, कार्तिक सातपुते, मयुर मेहता, आनंद राऊत, कार्तिक हिंगणे, भक्ती शिंदे या नूतनच्या बाल वारकऱ्यांनी अभंग, गौळण, भारुडाच्या सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सहसचिव जयप्रकाश बिहाणी,कार्यकारिणी सदस्य  सिताराम मंत्री, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, अंबादासराव पावडे, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, पालक यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी केले.  सुत्रसंचलन मृण्मयी इक्कर या विद्यार्थीनीने केले. तर आभार प्रदर्शन संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक लिंबेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिल्पा बरडे, सहविभाग प्रमुख डॉ. सुरेश हिवाळे, शैलजा कऊटकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, फुलसिंग गावित, सूर्यकाला सूर्यवंशी, वर्षा कदम, पुजा तोडकर, बाळू बुधवंत, संजय भूमकर, बाबासाहेब गोरे, उमेश क्षीरसागर, अरूण रामपुरकर, केशव डहाळे यांनी पुढाकार घेतला.ग्रंथ दिंडीने वेधले बाल वारकऱ्यांच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी, संत नामदेव, संत तुकाराम गाथा, तुळसी वृंदावन होते. पाऊली खेळत टाळांचा गजरासह  ‘ जय हरी विठ्ठल ‘ , ‘ज्ञानदेव तुकाराम ‘ यांच्या जयघोषात नूतन विद्यालयाच्या प्रवेश द्वारातून मान्यवरांना सोबत घेऊन सभागृहातकडे निघालेल्या या ग्रंथ दिंडीने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page