Monday, April 20, 2026
HomePoliceघराचे कुलूप तोडून सोन्याचे दागीने चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड
spot_img

घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागीने चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागीने चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

श्रेयश वानखेडे  :- देवाडा त. चंद्रपूर येथे घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले असून आरोपी किष्णा रामप्रसाद ठाकरे (२५) वर्ष, रा. मौजा देवाडा, जि. चंद्रपुर याचा कडून ३ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले.
             देवाडा, चंद्रपूर, येथील श्रीमती कल्पना वामन उपरे हे दिनांक ११ जुलै  रोजी कॅटर्सचे कामावर गेली असता, कोणी तरी अज्ञात इसामाने घराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून घरामधील आलमारीतील सोन्याचे दागीने चोरून नेले होते. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, पडोली येथे अप. क्रमांक ८१/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
    सदर गुन्हयाचे गांर्भीय पाहता, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे चंद्रपुर शहर परिसरात रवाना होवुन अथक परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून मुखबिरचे खबरे वरून आरोपी  किष्णा रामप्रसाद ठाकरे (२५)  रा. मौजा देवाडा, जि. चंद्रपुर यास ताब्यात घेवुन अधिक विचारपूस करून त्याचेकडुन ३७ ग्रॅम सोन्याचे दागीने किमंत अंदाजे ३ लाख ५४ हजार ५०० रूपयाचा माल जप्त करण्यात आले.
      सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक  विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इसान खान, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार, पोशि हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page