Tuesday, May 5, 2026
HomeEducation"आन द स्पाॅट करप्शन " विरुद्ध खाजगी शाळा शिक्षक संघाचे आंदोलन
spot_img

“आन द स्पाॅट करप्शन ” विरुद्ध खाजगी शाळा शिक्षक संघाचे आंदोलन

“आन द स्पाॅट करप्शन ” विरुद्ध खाजगी शाळा शिक्षक संघाचे आंदोलन 

श्रेयश वानखेडे:

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी १०० टक्के अनुदानित तुकडीवर किंवा शाळेत सेवेत असणाऱ्या शिक्षक कर्मचारी यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे, परंतु नागपूर माध्यमिक वेतन पथक कार्यालयाने, काही शिक्षकांना एनपीएस वर्गणी साठी आग्रह धरलेला असुन त्यांचे निर्वाह निधी खाते बंद केले आहे, शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मार्गदर्शन येण्यासाठी धीर नाही असा आक्षेप मोरेश्वर मौदेकर, अध्यक्ष व रितेश कुलसुंगे उपाध्यक्ष यांनी नोंदविला, अनुकंपा नियुक्ती प्रकरणे, अनुकंपा मान्यता  प्रकरणे मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात प्रलंबित आहेत, यात आन द स्पाॅट करप्शन हा मोठा प्रकार आहे,शंभर दिवसात प्रकरणे निकाली काढण्यात हा विभाग अपयशी ठरला आहे.

शालार्थ आयडी प्रदान करण्यासाठी शाळांनी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांच्या फाईल्स संबंधित लिपिक माध्यमिक यांचेकडे दोन-दोन, महिने पडुन आहेत मागणीची पूर्तता करण्याच्या फाईल्स पुढे जातात अशी उघड उघड चर्चा आहे असे विजय नंदनवार यांनी सांगितले.

          मुख्याध्यापक, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मान्यता अडवून ठेवणे, हा या कार्यालयाचा नित्याच्या भाग आहे, पेन्शन प्रकरणात १०० टक्के मान्यता पत्र संलग्न असतांनाही,तीच त्रुटी काढली जाते, माजी शिक्षणाधिकारी यांनी आपल्या काळात नियमबाह्य मान्यता प्रदान केली असून आपल्या पुतणी, भावाची पत्नी यांच्या मागील वर्षाची नियुक्ती दाखवून मान्यता प्रदान केली, संस्थेच्या चुकीच्या मान्यता नियमित केल्या, उच्च न्यायालय अवमान याचिकेला घाबरत नाही, याबाबत पवन नेटे यांनी  चौकशीची मागणी केली.

      वेतन पथक अधिक्षक यांचेकडे प्रलंबित, बँकेत जमा असलेली रक्कम, मार्च अखेरीस पारित झालेल्या वैद्यकीय देयकातील रक्कम ₹ एक कोटी एकोणीस लक्ष, बँकेत जमा आहे, खात्यावर जमा केले नाही, बँकेला देयके अडविण्यासाठी 48 तासा इतकाच वेळ असतो पण ही बँक शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचारात सहकारी आहे.हा आक्षेप ज्ञानेश्वर वाघ यांनी नोंदविला.

    खाजगी शाळा शिक्षक संघाच्या संविधान चौक नागपूर,सोमवार, दिनांक ४ जुलै, दुपारी तीन ते पाच या वेळेतील आंदोलन असे सर्वश्री माजी आमदार नागोराव गाणार, प्रमोद रेवतकर,विजय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, पवन नेटे मोरेश्वर मौदेकर , विजय आगरकर, भिमराव वानखेडे,संजय बोरगांवकर, ज्ञानेश्वर नागमोते, कुमुद बालपांडे, दिपिका हेडावु,रितेश कुलसंगे, देवानंद गीरी, प्रेम इलपाची, जयदेव वाढीवे, तेजराज राजुरकर,  प्रा.विजय पाटील,संजय बोरगावकर, दिलिप निखाडे, मोहन परसोडकर, वैशाली बघेल, वसंतराव थाटे, सुनील गोवरदीवे, मिनाक्षी भगत, प्रिती कावळे, निलेश बायो, प्रमोद कुंभार, निकिता साखरे, विद्या घोष, वंदना भुसे, शबाना शेख, लक्ष्मण शिंदे, अनुकंपा ग्रस्त मयत शिक्षक-कर्मचारी यांचे वारस उपस्थित होते. निवेदन विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले

[फोटो :- आंदोलनात सहभागी शिक्षक व निवेदन देताना खाजगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी ]

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page