श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
शिबीरात 71 रूग्णांची नाडी तपासणी करण्यात आली.
श्रेयश वानखेडे : दि.18 सोमवार रोजी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारोती नगर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,श्री क्षेत्रत्र्यंबकेश्वर,जि,
नाशिक सद्गुरू प.पू.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व नाडी परिक्षण तसेच सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी डाॅ. दिलीपकुमार पाटील, डाॅ.नानासाहेब शेवाळे डाॅ.सुकंन्या भाबट , कार्तिक दळवे, नागेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, संजय गव्हाडे, पांडुरंग आवचार, शैलेश बारसकर, रत्नप्रभा मगर, अंजली रोडगे, सिंधू वानखेडे आदी उपस्थित होते. शिबिराची सुरूवात श्री स्वामी समर्थ महाराज व धन्वंतरी पुजनाने आणि दीपप्रज्वलन करून डाॅ शेवाळे व डाॅ पाटील यांनी उदघाटन केले असुन या शिबिरात सांधेविकार, पक्षाघात, गुडघेदुखी, मनक्यांचे विकार, कफ,वात पित्त,मुळव्याध, अशा विविध रोगांवर तपासनी करण्या त आली संपूर्ण परभणी जिल्ह्य़ा त तालूका ठिकाणी दि 14 ते दि 21 पर्यंत 8 ठिकाणी शिबीर आयोजन करण्यात आले असुन वेगवेगळ्या आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परमेश्वर तमखाने, अमोल बारसकर, शंकर गात, पांडुरंग आवचार, सुमित शर्मा, उध्दव झिंजान, अनंत तेलभरे, आदिनी सहकार्य केले.