सेलू नगर परिषद कर्मचारी यांना दिवाळी – आनंदाचे वाटप.
Jyotsna Wankhede: नगर परिषद, सेलू येथील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींना दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी नगर परिषद सफाई कामगार कार्यालय येथे दिनांक 24/10/25 शुक्रवार रोजी सकाळी माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर यांच्या हस्ते दिपावली निमित्त मिठाई भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे कामगार बांधवांप्रती आपुलकी, आदर आणि स्नेह व्यक्त करण्यातआले. या प्रसंगी नगर परिषद सफाई कमागार निरीक्षक श्री खडूं चव्हाण,खुळे,व 200कर्मचारी उपस्थिती होते.या वेळी विनोद तरटे,योगेश कुलकर्णी यांची उपस्थित होते.