Saturday, December 6, 2025
HomeParbhaniयुवामोर्चा भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी अतुल रामराव गजमल यांची नियुक्ती.
spot_img

युवामोर्चा भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी अतुल रामराव गजमल यांची नियुक्ती.

युवामोर्चा भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी अतुल रामराव गजमल यांची नियुक्ती.

Jyotsna Wankhede  : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र भाऊ फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र भाऊ चव्हाण,यांच्या आदेशाने व पालकमंत्री मा. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण युवामोर्चा भाजपा सेलू तालुका उपाध्यक्ष पदी अतुल रामराव गजमल यांची नियुक्ती सन्माननीय पालकमंत्री तथा राज्यमंत्री सौ मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. भाजप कार्यात त्यांनी केलेल्या सक्रिय सहभाग व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून  ग्रामीण भागातील युवकांना सर्व स्तरांवर भारतीय जनता पक्षाचे केंद्र व राज्य सरकारचे विचार, धोरणे आणि जनकल्याणकारी योजना पोहोचाव्यात, तसेच पक्ष विस्तारा चे कार्य अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या निमित्ताने भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, राजवाडी चे सरपंच शिवहरी शेवाळे,राजे भाऊ कदम यांच्या हस्ते बोर्डीकर निवासस्थानी येथे अतुल गजमल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page