Jyotsna Wankhede:
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ द्वारे आयोजित अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२६ साठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत, राज्य शिक्षक संघाचे पुरस्कृत व म.रा. आय.टी.आय. निदेशक संघटनेचे समर्थित उमेदवार दिलीप भिमरावजी कडू यांचा निवडणूक प्रचार शुभारंभ व शिक्षक मतदार नोंदणी आढावा सभा विमलाबाई देशमुख सभागृह, शिवाजी शिक्षण संस्था कार्यालयाच्या समोर, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
अंबादेवी मंदिर, अमरावती येथून अंबादेवीचे दर्शन व आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभा पार पडली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विमाशी संघाचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले, अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. व्हि. यू. डायगव्हाणे, उमेदवार श्री. दिलीप कडू, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष श्री. विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह श्री. बाळासाहेब गोटे, राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री. भोजराज काळे, अध्यक्ष श्री. अनिल भारसाकळे, श्री. राम बारोटे, मेस्टा संघटनेचे श्री. संदीप गावंडे, श्री. प्रशांत लांडे, श्री. अनिल आसलकर, एम.सी.व्ही.सी संघटनेचे श्री. सुधीर ठवळी, श्री. विलास रोडे, श्री. मधुकर रोडे, श्री. प्रदीप थोरात, विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दशरथ रस्से, श्री. अतुल देशमुख, श्री. पवन बन, श्री. विष्णू अवचार, जिल्हा कार्यवाह श्री. आशिष इंगळे, श्री. अरविंद चौधरी, श्री. रामकृष्ण जीवतोडे, श्री. नितीन गायकवाड, श्री. वसंता माळी, श्री. सतीश शेळके, श्री. विनायक उज्जैनकर व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, राज्य शिक्षक संघ व समविचारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उमेदवार श्री. दिलीप कडू यांना सभेत एम.सी.व्ही.सी संघटनेने पाठिंबा दिला.
आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी उपस्थित शिक्षकांना राज्यातील शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शन केले. अमरावती विभागात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अधिकृत व अनेक संघटनेने पाठिंबा दिलेले उमेदवार श्री. दिलीप कडू यांना निवडून आणण्याचे आवाहन आमदार श्री. सुधाकर अडबाले व माजी आमदार श्री. व्ही.यू. डायगव्हाणे यांनी उपस्थित शिक्षक, पदाधिकारी व सदस्यांना केले.
सभेनंतर उमेदवार श्री. दिलीप कडू यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.