Saturday, December 6, 2025
HomeParbhaniसेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे.
spot_img

सेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे.

सेलूच्या गटशिक्षणाधिकारीपदी गजानन वाघमारे.

Jyotsna Wankhede  : दि 30 गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांना सेलूच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.उमेश राऊत यांची बदली झाल्याने गजानन वाघमारे यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.गजानन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सेलूच्याशिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.कुठलीही फाईल न थकव ता शिक्षकांना ते न्याय देतात. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य मापन,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, प्राथमिक शिक्षण विभागात लहान मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी,परसबाग योजना यासह शासनाच्या योजना प्रभावीपणे सेलू तालुक्यात ते राबवतात.आता विस्तार अधिकारी सोबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार आल्याने गजानन वाघमारे यांना आणखी काम करण्यास संधी प्राप्त झाली असून त्यांना दिलेल्या पदभार बद्दल शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page