Saturday, December 6, 2025
HomePuneKIDZEE ताथवाडे, पुणे यांना “Fastest Growing New Center – Brand Evangelist” हा...
spot_img

KIDZEE ताथवाडे, पुणे यांना “Fastest Growing New Center – Brand Evangelist” हा राष्ट्रीय पुरस्कार

KIDZEE ताथवाडे, पुणे यांना “Fastest Growing New Center – Brand Evangelist” हा राष्ट्रीय पुरस्कार

Jyotsna Wankhede:
किडझी ताथवाडे, पुणे या प्री-स्कूलला त्यांच्या पहिल्याच शैक्षणिक वर्षात “Fastest Growing New Center – Brand Evangelist” हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या प्री-स्कूलचे संचलन धनश्री विपुल निलपवार आणि रोहिणी सागर जगदाळे करत आहेत.
KIDZEE National Award Ceremony – Pinnacle 2025 हा पुरस्कार सोहळा १५ नोव्हेंबर २०२५ रोजी द वेस्टिन हॉटेल, पॉवई, मुंबई येथे पार पडला. देशभरातील २७०० प्री-स्कूल्समधून फक्त ६० केंद्रांची निवड झाली आणि त्यात किडझी ताथवाडेचा समावेश होणे ही अभिमानाची बाब आहे. मार्च २०२५ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
IT क्षेत्रातील व्यावसायिकतेतून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करताना धनश्री निलपवार यांची यात्रा त्यांच्या मते “स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव” आहे. अनेक वर्षे बालविकासाच्या क्षेत्रात काम केल्यानंतर हा पुरस्कार अधिक जोमाने कार्य करण्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.
या यशाचे श्रेय ईश्वर, आई-वडिलांचे आशीर्वाद तसेच पती आणि मुलांच्या साथ व पाठिंब्याला देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांचे विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तसेच किडझी टीमच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
किडझी ताथवाडेचा हा बहुमान संपूर्ण ताथवाडे परिसरासाठी अभिमानास्पद ठरला असून, उत्कृष्ट आणि दर्जेदार बालशिक्षण देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी झाली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page