Jyotsna Wankhede: दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने आज सेलू तहसीलदार यांना दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर तालुकाध्यक्ष दिंगाबर घोळवे यांच्या नेतृत्वात दिव्यागांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शासनाच्यावतीने दिव्यांगांना प्रतिमहा 2500 रुपये पेंशनची घोषणा होऊनही सेलु तालुक्या तील 70% दिव्यांगांना 1500 रुपये पेंशन त्यांच्या खात्यावर पडत आहे तर काही दिव्यांगांना पेंशनच पडत नाही,तसेच सदर घोषणा होऊनही बराच काला वधी होऊन गेलेला असताना देखील सेलु तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव अद्यापही सदर पेंशन रकमेपासुन वंचित आहेत तर काही बांधवांना प्रतिमहा केवळ रुपये 1500 जमा होत आहेत. याबाबत आम्ही दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार साहेबांना दोन तीन वेळेस भेटुन याबाबत माहिती दिलेली असताना तहसीलदार साहेबांनी सर्वांना 2500 रु जमा होतील असे सांगितले होते तरीही या नोव्हेंबर महिन्यात पण दिव्यांगांना 1500 रुपये एवढीच पेंशन जमा झाली आज मा.तहसीलदार साहेबांना तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी भेटुन या महिन्यात जर मागच्या आँक्टोंबर महिन्याचे व नोव्हेंबर महिन्याचे राहिलेले प्रत्येकी 1 हजार रुपये असे दोन्ही महिन्यांचे सर्व दिव्यांग बांधवांचे 2 हजार रुपये आमच्या दिव्यांगांच्या खात्यावर जमा नाही झाले तर आणि प्रत्येक महिन्याची 2500 रुपये पेंशन जमा झाली नाही तर सेलु तहसील कार्यालयासमोर दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्यावतीने पुढील 15 दिवसानंतर उपोषण करण्यात येईल असे सांगितले